‘जनमताचा कौल विश्वासघाताने नाकारण्या एवढे तुम्ही नक्कीच नतद्रष्ट आहात’, भाजपची टीका

CM Uddhav Thackeray-Atul Bhatkhalkar

मुंबई : शुक्रवारी मुंबई मेट्रोच्या (Mumbai Metro) मेड इन इंडिया कोचचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाचा भाषणामध्ये ठाकरेंनी दरेकरांचं नाव घेऊन फडणवीस सरकारच्या कामांची स्तुतीही केली. यापूर्वीच्या सरकारनेही उत्तम काम केलं. असं नाही की, यापूर्वीच्या सरकारने चांगलं काम केलं नाही, असं म्हणणारा मी नतभ्रष्ट नक्कीच नाही. पूर्वीच्या सरकारने जे काम केलं ते नाकारण्याचा नतभ्रष्टपणा मी करणार नाही.’ असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यांच्या विधानावर भाजपने (BJP) जहरी टीका केली.

उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यावर भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी टीका केली आहे. भाजप व शिवसेनेच्या महायुतीला मिळालेल्या बहुमताची आठवण त्यांनी करून दिली आहे. महायुतीला बहुमत मिळालेलं असताना काही मतभेदांमुळे शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेस सोबत गेली. या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं आणि भाजपला विरोधी पक्षात बसावं लागलं आहे. ‘आधीच्या सरकारला मिळालेला जनमताचा स्पष्ट कौल विश्वासघाताने नाकारण्या एवढे तुम्ही नक्कीच नतद्रष्ट आहात…’ अशी जहरी टीका अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER