शरद पवारांशी चर्चा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची हकालपट्टी करा -भातखळकर

Atul Bhatkhalkar-Sharad Pawar

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्यावर मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेली होती. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले.

राज्यात कोणतेही अधिकार पद नसलेल्या पवारांशी चर्चा करणाऱ्या या पोलीस अधिकाऱ्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी मी कॅबिनेट सचिवांकडे करणार असल्याचे अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केले आहे.


पोलिस अधिकाऱ्यांनी शरद पवारांसोबत चर्चा करायला ते राज्याचे गृहमंत्री आहेत की मुख्यमंत्री? अ म्हणत से भातखळकरांनी नांगरे-पाटलांवर टीका केली आहे.

दरम्यान, अतुल भातखळकरांनी केलेल्या टीकेवर विश्वास नांगरे पाटील काय प्रतिउत्तर देतात , याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER