तोंड फोडून घ्यायची आवड असलेले महा निर्लज्ज आघाडी सरकार, भातखळकरांची टीका

atul bhatkhalkar-CM Uddhav Thackeray

मुंबई : सध्या मेट्रो कारशेडच्या मुद्यावरून ठाकरे सरकार (Thackeray Government) विरुद्ध भाजपा (BJP) असा सामना रंगला आहे. आरे येथील कारशेडचे काम बंद करून मेट्रो कारशेड कांजूरमार्गमध्ये स्थलांतरित करण्यात आली होती. या ठिकाणी मेट्रो कारशेड उभारण्यास केंद्राच्या याचिकेमुळे उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पासाठीच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील जागेत कारशेड उभारण्याच्या पर्यायावर राज्य सरकारने चाचपणी केली आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारनेच गठित केलेल्या पॅनेलने दिलेल्या अहवालावरून भाजपाने ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

सौनिक समितीतील सदस्यांनी मुंबई आणि उपनगरांत सर्व ठिकाणी भेटी दिल्या आणि त्यानंतर एक अहवाल सादर केला. त्या अहवालात मेट्रो ३ च्या कारशेडसाठी आरेव्यतिरिक्त दुसरा चपखल बसणारा पर्याय नसल्याचे नमूद करण्यात आले. काही ठिकाणे पर्यावरणाच्या दृष्टीने न चालणारी तर काही ठिकाणे आर्थिकदृष्ट्या न परवडणारी असल्यामुळे आरेइतकी उत्तम जागा मुंबईत नसल्याचे अहवालात सांगण्यात आले. या मुद्द्यावर ट्विट करत भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे सरकारवर टीका केली. तोंड फोडू घेण्याची सवय असणाऱ्यांना लाज वाटत नाही आणि म्हणूनच हे सरकार महानिर्लज्ज आहे, असं ट्विट त्यांनी केलं. “आरे कारशेडचे सगळे पर्याय अव्यवहार्य… समितीचा अहवाल… तोंड फोडून घ्यायची आवड असलेले महा निर्लज्ज आघाडी सरकार…”, अशा शब्दात त्यांनी ठाकरे सरकारची खिल्ली उडवली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER