
मुंबई : दिल्लीत सुरू असलेले शेतकरी आंदोलन मरतुकड्या विरोधी पक्षामुळे ‘पेटत’ नसल्याची खंत सामनाच्या अग्रलेखात व्यक्त केली आहे. यावरून भाजपने (BJP) शिवसेनेवर (Shivsena) टीकास्त्र सोडले .ही तर कमालच झाली. महाराष्ट्राचा ‘वाघ’ गेले ८ महिने घरी बसून मोदी-शहांवर भडिमार करतोय. मुखपत्रातून आग ओकतोय. त्यालाही घरच्यांनीही ‘मरतुकडा’ म्हणावं हे जरा अतिच नाही का? अशा शब्दात भाजपाचे अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) टीका केली आहे .
दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता जवळपास महिना होत आला. कडाक्याच्या थंडीत शेतकरी शेतीविषयक कायद्यांना विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. त्यांना विरोधी पक्षांनी जाहीर पाठिंबा दिला. शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी भारत बंद पाळण्यात आला. विरोधी पक्षाचे शिष्टमंडळ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन आले. काँग्रेस या कायद्यांना विरोध करणाऱ्या दोन कोटी शेतकऱ्यांच्या सह्या असलेले पत्र सरकारदरबारी प्रस्तुत केले. एवढ्या साऱ्या गोष्टी घडूनही सत्ताधारी मोदी सरकारवर विरोधकांना म्हणावा तसा दबाव टाकता आलेला नाही. या अपयशाचे खापर शिवसेनेने काँग्रेसच्या माथी फोडले आहे. याच मुद्द्यावरून भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.
दिल्लीत सुरू असलेले शेतकरी आंदोलन मरतुकड्या विरोधी पक्षामुळे ‘पेटत’ नसल्याची खंत सामनाच्या अग्रलेखात व्यक्त केली आहे.
ही तर कमालच झाली. महाराष्ट्राचा ‘वाघ’ गेले 8महिने घरी बसून मोदी-शहांवर भडिमार करतोय.मुखपत्रातून आग ओकतोय,त्यालाही घरच्यांनीही मरतुकडा म्हणावं हे जरा अतिच नाहीका?— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 26, 2020
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला