… तर संपूर्ण ‘दालच काली’ आहे; अतुल भातखळकरांचा संजय राऊतांना टोमणा

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा यांना ईडी (अंमलबजावणी संचनालय) ने पीएमसी बॅंके (PMC BANK) घोटाळ्याप्रकरणी नोटीस पाठवली आहे. चौकशीसाठी हजर होण्यासाठी वर्षा यांनी ५ जानेवारीपर्यंत वेळ मागितला आहे. चौकशीसाठी जाण्याला उशीर केल्याबद्दल भाजपाचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी राऊतांना टोमणा मारला, तीन वेळा समन्स मिळूनही आपण जर चौकशीसाठी हजर होणार नसू तर दाल में कुछ काला है. नव्हे; संपूर्ण दालच काली आहे असे मानायला वाव आहे. चौकशीची एवढी भिती कशासाठी?

वर्षा राऊत (Varsha Raut) यांना ईडीची (ED) नोटीस आल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राऊत यांच्यासह महाविकास आघाडीतील नेत्यांनी ही कारवाई सूडबुद्धीने केली जात असल्याचा आरोप केला आहे. त्याच वेळी, काही चूक केली नसेल तर तर भिण्याचे कारण काय? असा प्रश्न विचारत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER