
मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे . यापार्श्वभूमीवर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.
ही बातमी पण वाचा:- एकास तीन हे तर भित्रे, रडव्यांचे लक्षण – आशिष शेलार
“महाविकास आघाडीची समस्या आम्ही समजू शकतो. त्यांच्याकडे दोनच पर्याय आहेत. अकार्यक्षमतेमुळे आम्ही राज्याला विनाशाच्या खाईत लोटले असल्याचे मान्य करणे किंवा रेटून खोटे बोलणे. पहिला पर्याय स्वीकारण्याइतका प्रामाणिकपणा त्यांच्यात नाही, त्यामुळे खोटारडेपणा सुरू आहे,” असे म्हणत भातखळकरांनी महाविकास आघाडीला टोला लगावला. त्यांनी ट्विटरवरून सरकारवर निशाणा साधला.
महाविकास आघाडीची समस्या आम्ही समजू शकतो. त्यांच्याकडे दोनच पर्याय आहेत अकार्यक्षमतेमुळे आम्ही राज्याला विनाशाच्या खाईत लोटले असल्याचे मान्य करणे किंवा रेटून खोटे बोलणे. पहिला पर्याय स्वीकारण्या इतका प्रामाणिकपणा नाही, त्यामुळे खोटारडेपणा सुरू आहे.
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 27, 2020
दरम्यान भाजपा हा महाराष्ट्राचा मित्र आहे की शत्रू हा प्रश्न आम्हाला कालपासून पडला आहे. देवेंद्र फडणवीस हे कोविड आणि करोनाच्या संकटात महाराष्ट्र सरकारच्या पाठिशी उभे राहतील असे वाटले होते . मात्र दुर्दैवाने तसे झाले नाही. देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेली आकडेवारी चांगली आहे मात्र त्यात तथ्य नाही असे मत मंत्री जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेदरम्यान व्यक्त केले होते .
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला