‘काय अवस्था झाली मुख्यमंत्र्यांची, मदतीसाठी सक्ती केली तरीही लोक जुमानत नाहीत’

Atul Bhatkhalkar and cm uddhav thackeray

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Crises) वाढल्याने जवळपास दीड वर्षांपासून महाराष्ट्रात कधी लॉकडाऊन (Lockdown) तर कधी कडक निर्बंध घालण्यात आले. आजही महाराष्ट्रात कडक निर्बंध कायम आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील आर्थिक घडी पूर्णतः विस्कटली. हवा तेवढा महसूल मिळत नसल्याने सरकारी तिजोरीवर याचा परिणाम झाला आहे. सरकारच्या तिजोरीत पैश्यांची कमी भासत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करण्याचे आवाहन केले आहे. तर सरकारी कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्याची सक्ती केली आहे.

मात्र राज्यभरातील महापालिका कर्मचाऱ्यांनी याचा विरोध केला असून, ठाकरे सरकारने केलेल्या सक्तीच्या विरोधात न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. आणि याच मुद्द्यावरुन भाजपचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. ठाकरे सरकारने पालिका कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री निधीत पैसे देण्याची सक्ती केली आहे. परंतु पालिका कर्मचाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास नसावा. ही सक्ती मान्य नसल्याचे सांगत त्यांनी कोर्टात धाव घेतली. काय अवस्था आहे मुख्यमंत्र्यांची, मदतीसाठी सक्ती करावी लागतेय तरीही लोक जुमानत नाहीत, अशी खोचक टीका भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button