आदित्य ठाकरे उपनगरात दाखवा, 18 ते 44 वयोगटासाठी लसीकरण फुकट मिळवा; भाजप नेत्याची ऑफर

Aditya Thackeray and Atul Bhatkhalkar

मुंबई : भाजप (BJP) आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) उपनगरात दाखवा आणि 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण करून घ्या, अशी ऑफरच भातखळकर यांनी दिली आहे.

भातखळकर यांनी ट्विटरवरून एका व्हिडीओच्या माध्यमातून आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला . यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कसे अपयशी ठरले आहेत, याकडेही लक्ष वेधले. मे महिन्यात आलेले निसर्ग चक्रीवादळ आणि परवा आलेले तौक्ते चक्रीवादळ यामुळे वर्सोवा, मढ, मार्वे, बोरिवली या परिसरातील मच्छिमारांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. मालाडमध्ये झाडाची फांदी पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. चाळी, झोपडपट्ट्या, इमारतींमध्ये पाणी शिरून लोकांच्या घरगुती साहित्याचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. झाडे पडल्यामुळे 48 तासांपेक्षा अधिक काळ अनेक ठिकाणी रस्ते बंद होते. मी स्वतः व भाजपने वारंवार मागणी करुनही कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत उपनगरांतील लोकांना करण्यात आली नाही, असा आरोप भातखळकर यांनी केला आहे.

मुंबईत वादळ आल्यानंतर पालकमंत्री आदित्य ठाकरे हे लोकांना वाऱ्यावर सोडून घरात बसून एसीची हवा खाण्यात मग्न होते. लपूनछपून ताडोबा पर्यटन करणाऱ्या आदित्य यांनी अपुऱ्या वैद्यकीय सुविधेअभावी तडफडून, होरपळून मृत्युमुखी पडणाऱ्या मुंबईतील रुग्णांकडे ढुंकूनही पाहिले नाही. आदित्य यांनी मागील वर्षभराच्या काळात एकाही कोविड केअर सेंटर किंवा रुग्णालयाला भेटी दिल्या नाहीत. त्यामुळे आदित्य यांनी मागील वर्षभराच्या काळात मुंबई उपनगराच्या नागरिकांसाठी काय काम केले? याचे जनतेला उत्तर द्यावे, असा सवालही त्यांनी केला आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button