दिल्लीत शरद पवारांना हाणले होते ते मंत्री जितेंद्र आव्हाड विसरलेले दिसताहेत ; भाजपा नेत्याची टीका

Atul Bhatkhalkar-Sharad Pawar-jitendra-awhad

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याविरोधात कार्टून फॉरवर्ड केल्याने एका निवृत्त अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी मारहाण केली. या संपूर्ण घडामोडीवर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) बाळासाहेबांचा जुना व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओला ‘काळाची गरज’ असे कॅप्शन दिल्याने नौदल अधिकाऱ्याच्या मारहाणीचं समर्थन राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) केले का? असा प्रश्न निर्माण झाला. यावरून आता भाजपा आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी जितेंद्र आव्हाडांवर निशाणा साधला आहे.

अतुल भातखळकर यांनी ट्विटमध्ये म्हटले की, मंत्रिपदावर असताना लोकांचे अपहरण करून मारहाण करणारे जितेंद्र आव्हाड भुरट्या गुंडगिरीचे समर्थन करणारच. मागे दिल्लीत एका तरुणाने पवारांना हाणले होते ते आव्हाड विसरलेले दिसतायत. त्याचेही समर्थन करा आता, अशा शब्दात भातखळकर यांनी आव्हाडांना टोला लगावला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER