यावेळी तरी वादळग्रस्तांना ठाकरे सरकारची मदत मिळणार का? भाजपचा मिस्कील सवाल

मुंबई :- अरबी समुद्रात (Arabian Sea) घोंघावणाऱ्या ‘तौत्के’ चक्रीवादळाचा (Tauktae Cyclone) परिणाम संपूर्ण महाराष्ट्रभर जाणवतो आहे. मुंबईत सकाळपासून जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळत आहेत. दर तासाला अधिक सक्रीय होणारे हे चक्रीवादळ सध्या गुजरातच्या दिशेने सरकत आहे. कोकण किनारपट्टीला समांतर वाटचाल करत असेलल्या तौत्के चक्रीवादळानं गती घेतल्यामुळं त्याचा फटका रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यालगत असणाऱ्या राजापूर, रत्नागिरी तालुक्यातील जवळपास सगळ्या गावांना बसला आहे. आणि याच मुद्द्यावरून भाजपचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी ठाकरे सरकारला (Thackeray Govt) लक्ष्य केले आहे.

चक्रीवादळाच्या तांडवामुळे राज्याच्या कोकण किनारपट्टीला जबरदस्त तडाखा बसल्याचे वृत्त आहे. मुंबईतही अनेक घरांची छपरे उडाली असून लोकांच्या घरात पाणी गेले आहे.यावेळी तरी वादळग्रस्तांना ठाकरे सरकारची मदत मिळणार आहे का?, असा खोचक प्रश्न भातखळकर यांनी विचारला आहे.

तसेच शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेने चक्रीवादळाचा सामना करण्यास सज्ज असल्याचे म्हटले होते. मात्र आज सकाळपासून मुंबईतील जनजीवन अस्तव्यस्त झाले आहे. चक्रीवादळाचा परिणाम मुंबईवर दिसून येणार आहे. त्यामुळे आज लसीकरणाची प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. अनेक रस्ते बंद करण्यात आले आहे. यावरुनही भातखळकर यांनी महापालिकेला टोला हाणला. सत्ताधारी शिवसेनेची म्हणजेच मुंबई महापालिकेची जय्यत तय्यार होती. पण ढगच जरा जास्त आले, असे म्हणत त्यांनी मिस्कील टीकाही केली.

दरम्यान, चक्रीवादळाचा प्रभाव रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भागांत अजूनही जाणवत आहे. गुहागरसह चिपळूण, संगमेश्वरसह, दापोलीमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्याचप्रमाणे या भागांत रात्रभर प्रचंड वेगाने वारे वाहत असल्याने अनेक गावात झाडे उनमळुन पडून घरांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. तर आंबा, काजू बगायतदार यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टीवरून आतापर्यंत ६ हजार ५४० नागरिकांनी सुरक्षित स्थळी नेण्यात आलं आहे.

ही बातमी पण वाचा : ‘चक्रीवादळ गुजरातला पळविण्याचा मोदी-शहांचा डाव; मात्र संजय राऊत मुंबईतच रोखणार’

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button