‘मंत्र्यांना वाचवा आणि बाईला नाचवा’ ठाकरे सरकारचा हाच अधिकृत कार्यक्रम ! भातखळकर यांची जळजळीत टीका

Atul Bhatkhalkar - Maharastra Today
Atul Bhatkhalkar - Maharastra Today

मुंबई : जळगावातील महिला वसतीगृहात महिलांना कपडे काढून डान्स करायला लावल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या घटनेचे पडसाद आज विधिमंडळात उमटले. भाजपच्या आमदार श्वेता महाले (Shweta Mahale) यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला.

भाजपाचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी – जळगावच्या शासकीय वसतीगृहातील मुलींना पोलिसांनीच कपडे काढून नाचायला लावल्याचे उघड झाल्याने, मंत्र्यांना वाचवा आणि बाईला नाचवा, हा ठाकरे सरकारचा अधिकृत कार्यक्रम आहे का, अशी शंका येऊ लागली आहे, अशी जळजळीत टीका केली.

ते पुढे म्हणाले, या धक्कादायक घटनेमुळे असे लक्षात येते की, मविआ सरकारच्या राज्यात महिलांची अब्रू सुरक्षित नाही. मोगलाई सुरू असल्याची जनतेची खात्री पटली आहे.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील संशयित राज्याचे वनमंत्री संजय राठोड (शिवसेना) यांना वाचण्याचा सरकारने बराच प्रयत्न केला. त्यांनी दिलेला राजीनामा अजून मुख्यमंत्र्यांनी मंजुरीसाठी राज्यपालांकडे पाठवलेला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER