
मुंबई : शिवसेनेच्या ‘शिवशाही कॅलेंडर २०२१’मध्ये (Shivshahi Calendar 2021) उर्दूच्या समावेशात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचा उल्लेख ‘जनाब बाळासाहेब’ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उल्लेख ‘शिवाजी जयंती’ असा एकेरी करण्यात आला आहे. यावरून भाजपाचे नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी शिवसेनेला ‘करून दाखवले’ असा टोमणा मारला. निवडणुकीत ‘करून दाखवले’ हे शिवसेनेचे घोषवाक्य होते.
ही बातमी पण वाचा:- ‘शिवशाही कॅलेंडर’वर उर्दू : शिवसेनेला हिंदुत्वाच्या सर्टिफिकेटची गरज नाही; भातखळकरांचा टोमणा
शिवसेनेने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांना जनाब बाळासाहेब म्हणून वैचारिक सुंता करून घ्यावी तो त्याचा अंतर्गत प्रश्न आहे, परंतु अवघ्या देशाचे आराध्य असलेल्या शिवरायांची छत्रपती ही बिरुदावली काढणारे तुम्ही कोण? महाराष्ट्राची जनता तुमची खेटराने पूजा केल्याशिवाय राहणार नाही. pic.twitter.com/9tXVkq3I8i
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 31, 2020
अतुल भातखळकर यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शिवशाही कॅलेंडरचा फोटो आणि व्हिडीओ शेअर केला त्यात शिवसेनेला हिंदुत्वाच्या सर्टिफिकेटची गरज नाही, म्हणत टोमणा मारला. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांना ‘जनाब बाळासाहेब’ म्हणून शिवसेनेने वैचारिक सुंता करून घ्यावी, तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण अवघ्या देशाचे आराध्य असलेल्या शिवरायांची छत्रपती ही बिरुदावली काढणारे तुम्ही कोण? महाराष्ट्राची जनता तुमची खेटराने पूजा केल्याशिवाय राहणार नाही, अशी शिवसेनेवर टीका केली.
शिवसेनेने अजान स्पर्धेचे आयोजन केले त्यावेळीच मी म्हटले होते की, आता भगवा तर शिवसेनेने सोडलाच; केवळ हिरवा हाती घेणे बाकी आहे. वडाळा विधानसभेच्या शिवसेनेने उर्दूमध्येच कॅलेंडर काढले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा जनाब बळासाहेब ठाकरे असा उल्लेख केला. यामध्ये उर्दू, मुस्लीम कॅलेंडरप्रमाणे तारखा, चंद्रोदय, सूर्योदयही दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवसाचा केवळ ‘शिवाजी जयंती’ असा एकेरी उल्लेख करण्याचे धाडस यातून करण्यात आले आहे. मी याचा तीव्र शब्दात निषेध करतो. औरंगाबादचे संभाजीनगर नाही पण मतांच्या लालसेपायी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नामकरण ‘जनाब बाळासाहेब ठाकरे’ करून दाखवले, असे भातखळकर म्हणालेत.
या कॅलेंडरमध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख जनाब उद्धव ठाकरे आणि जनाब आदित्य ठाकरे असा करण्यात आला आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला