पुरोगामी शरद पवार तुमच्या पक्षाचे महिला धोरण धनंजय मुंडेना पाठीशी घालणारे असेल पण…; भाजप नेत्याची टीका

Atul Bhatkhalkar-Sharad Pawar

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर रेणू शर्मा नावाच्या तरूणीने बलात्काराचा गंभीर आरोप केल्यामुळे खळबळ उडाली होती. यावरून भाजप नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP) टीकास्त्र सोडले आहे .

पुरोगामी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आपल्या पक्षाचे महिला धोरण धनंजय मुंडेना पाठीशी घालणारं असेल पण देशाचा कायदा मात्र वेगळेच सांगतो, असे भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केले आहे.

लिव्ह-इन रिलेशनशिपबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय, लग्न झाल्यावर दुसऱ्याशी संबंध हा गुन्हा, या निकालाचा आधार घेत भातखळकरांनी पवारांवर निशाणा साधला. याआधीही भातखळकरांनी मुंडेंच्या प्रकरणावरून पवारांवर टीका केली होती.

अत्याचार झालेल्या महिलेच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उभं करायचं आणि तिला सहानुभूती मिळणार नाही अशी व्यवस्था करून तिचे तोंड बंद करायचं. हे जुने तंत्र आहे. शरद पवारांनी या तंत्राचा रेणू शर्मा यांच्याविरोधात खुबीने वापर केला, अशी टीका भातखळकरांनी केली होती.

दरम्यान बलात्काराच्या आरोपानंतर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्षाने केली होती. मात्र त्यानंतर संबंधित तरूणीवर इतर नेत्यांनी ब्लॅकमेलचे आरोप केले त्यामुळे शरद पवारांनी मुंडेंच्या तूर्तास राजीनामा घेणार नसल्याचे सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER