“मुख्यमंत्र्यांना नारळ देऊन शरद पवारांनी सत्तेची सूत्रे हाती घ्यावी” – अतुल भातखळकर

Atul Bhatkhalkar

मुंबई :- सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावरील बलात्काराच्या आरोपांनंतर विरोधकांनी राष्ट्रवादी काँग्रेसला कोंडीत पकडण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. बलात्काराच्या आरोपांनंतर धनंजय मुंडे (Atul Bhatkhalkar) यांनी शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेऊन प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. शरद पवारांनीही तक्रार गंभीर असून पक्षातील नेत्यांशी चर्चा केल्यानंतर निर्णय घेतला जाईल असं म्हटलं आहे. यादरम्यान शरद पवारांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतल्याच्या वृत्तावर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे.

अतुल भातळखकर यांनी ट्विट करत शरद पवारांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावरही निशाणा साधला आहे. “पोलीस अधिकाऱ्यांनी शरद पवारांसोबत चर्चा करायला ते राज्याचे गृहमंत्री आहेत की मुख्यमंत्री? राज्यात कोणतेही अधिकार पद नसलेल्या पवारांशी चर्चा करणाऱ्या या पोलीस अधिकाऱ्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी मी कॅबिनेट सचिवांकडे करणार आहे. तसेच पाठीमागून सूत्र हलवण्यापेक्षा घरी बसलेल्या मुख्यमंत्र्यांना नारळ देऊन शरद पवारांनी सत्तेची सूत्रे हाती घ्यावी, असा उपहासात्मक सल्लाही अतुल भातखळकर यांनी दिला आहे.

ही बातमी पण वाचा : … हे सगळं शरद पवारांचे  नाटक ;  भाजप नेत्याची टीका 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER