… राहुल गांधींची कुवत आणि अक्कल जनतेला कळली; अतुल भातखळकर यांचा टोमणा

Atul Bhatkhalkar-Rahul Gandhi

मुंबई : भारतीय अन्न महामंडळाच्या देशभरातील एकूण ९३ गोदामांपैकी केवळ ९ गोदामे बांधण्याचे कंत्राट अदानींना मिळाल तर अंबानींना एकही नाही, अशी माहिती ग्राहक कामकाज आणि अन्नमंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी लोकसभेत दिली. याबाबतचा प्रश्न काँग्रेसचे नेते राहुल गांघी (Rahul Gandhi) यांनी विचारला होता. यावर भाजपाचे नेते आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी टोमणा मारला – या निमित्ताने राहुल गांधींची कुवत आणि अक्कल जनतेला समजली.

भारतीय अन्न महामंडळ (एफसीआय) आणि भाजपाची सत्ता असलेल्या राज्य सरकारकडून २०१४ पासून गोदामे बांधण्यासाठी अंबानी आणि अदानींनी किती करार मिळवले याची माहिती मागून मोदी सरकारला पेचात पाडता येईल, या हेतूने राहुल गांधी यांनी हा प्रश्न विचारला होता.

भारतीय अन्न महामंडळाच्या देशभरातील एकूण ९३ गोदामांपैकी केवळ ९ गोदामी बांधण्याचे कंत्राट अदानींना मिळाले तर अंबानींना एकही नाही.

ही वस्तुस्थिती उघड झाल्यानंतर अतुल भातखळकर यांनी राहुल गांधींची अक्कल काढली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER