जनमताशिवाय राजा आणि परीक्षेशिवाय पदवी… अजब तुझे सरकार!

Atul Bhatkhalkar-Uddhav Thackeray

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्यात. त्यातच अंतिम वर्षांच्या परीक्षेसंदर्भात काय करायचे? असा प्रश्न होता. परंतु, आता ती अंतिम परीक्षाही रद्द झाली आहे. अंतिम परीक्षा रद्द करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर विरोधकांनी मुख्यमंत्र्यांनाच ट्रोल केले आहे. पहिले निलेश राणे त्यांच्यानंतर आता भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनीही परीक्षा आणि मुख्यमंत्रिपदाचा सहसंबंध जोडून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

ही बातमी पण वाचा:- उद्धव ठाकरेंच्या ‘विज्ञान’ ‘कला’च्या अगम्य भाषणाची झडती घेणारे मनसेचे बोचरे ट्विट

“जनमताशिवाय राजा आणि परीक्षेशिवाय पदवी… अजब तुझे सरकार,” अशी टीका अतुल भातखळकर यांनी मुक्यमंत्री ठाकरेंवर केली आहे.

“जनमताशिवाय राजा आणि परीक्षेशिवाय पदवी… अजब तुझे सरकार” अशी टीका अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर केली आहे. त्यांच्याआधी निलेश राणेंनीही “जे परीक्षा न देताच मुख्यमंत्री झाले, त्यांनी हा निर्णय घेणं हे काही नवल नाही.” असा टोला मुख्यमंत्र्यांना लगावला.

दरम्यान, कोरोनाच्या संकटापासून कधी मुक्तता मिळेल याबाबत अनिश्चिततेचा फटका पदवी-पदव्युत्तरच्या अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांना बसू नये, यासाठी परीक्षांऐवजी आतापर्यंत मिळवलेल्या गुणांची सरासरी काढून विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जाहीर केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER