आदित्य ठाकरे यांचा ढोंगी चेहराही आता उघड झाला ; अतुल भातखळकरांची टीका

atul-bhatkhalkar-has-criticized-aditya-thackeray

मुंबई :- मुंबईकरांच्या हक्काच्या मेट्रोचे कारशेड (Metro’s car shed) आरे मधून इतरत्र हलविणाऱ्या ठाकरे सरकारने आता आरे मध्येच झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प जाहिर करून आरेची जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचे कारस्थान रचले आहे . हे अत्यंत संतापजनक असून मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) व महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारचे पर्यावरण प्रेम हे पूर्णतः बोगस व बेगडी आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले असल्याची टीका भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी केली आहे.

मुंबईकरांना फायद्याचा असणारा मेट्रो कारशेड प्रकल्प खोटी कारणे देत आरे येथून इतरत्र हलवून मुंबईकरांचे नुकसान केले, पण आता स्वतः सह बिल्डरांचे उखळ पांढरे करण्यासाठीच ठाकरे सरकारचे (Thackeray Govt.) हे उद्योग सुरू आहेत. याविरोधात भारतीय जनता पार्टी मोठे जन आंदोलन उभारेल व गरज पडल्यास उच्च न्यायालयात सुद्धा जाणार असल्याचा इशारा सुद्धा आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिला आहे.

ही बातमी पण वाचा : ठाकरे सरकार ‘मुंबई मॉडेल’ खोटं, इथल्या रुग्णांची नोंद पुण्यात; नितेश राणेंचा आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button