‘धिक्कार असो या नाकर्त्यांचा !’ आरक्षण रद्द केल्याप्रकरणी अतुल भातखळकरांचा संताप व्यक्त

मुंबई : राज्य सरकारने (Thackeray Govt) बनवलेला मराठा आरक्षण (Maratha reservation) कायदा सुप्रीम कोर्टाने (Supreme court) रद्द केला आहे. यामुळे महाराष्ट्र सरकारला चांगलाच धक्का बसला आहे. सुप्रीम कोर्टाने निकाल सुनावताना मुंबई हाय कोर्टाने दिलेला निर्णय आणि मागास आयोगाच्या रिपोर्टमधून आम्हाला मराठा आरक्षण देणे गरजेचे आहे, हे स्पष्ट होत नसल्याचे सांगितले. आरक्षण रद्द केल्याप्रकरणी आता विविध स्तरांवरून टीकास्त्र सोडले जात आहे. विद्यार्थी, कार्यकर्ते यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनीही सरकारवर टीका करत या निर्णयाचा निषेध केला आहे. यासंदर्भात भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) आणि राम कदम यांनी ट्विट केले आहेत.

भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी यावरून आता ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “ठाकरे सरकारमध्ये बसलेल्या मराठा नेत्यांनी  मराठा समाजाला न्याय दिला नाही. त्यांना मराठा आरक्षणाच्या विषयाचे फक्त राजकारण करायचे आहे. त्यामुळेच हा विषय कोर्टात टिकला नाही. मराठा समाजावर घनघोर अन्याय झाला.” असे म्हणत भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. पुढे ते म्हणाले की, “मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलं आहे. महावसुली आघाडी सरकारने सत्ता हातात घेतल्या दिवसापासून मराठा आरक्षणाच्या विषयाचे पोतेरे केले. कोर्टात ठामपणे बाजू मांडली नाही. फडणवीस सरकारने मराठा आरक्षणासाठी केलेली यशस्वी व्यूहरचना पूर्णपणे कोलमडून टाकली. धिक्कार असो या नाकर्त्यांचा.”

या शब्दांत ट्विट करत भातखळकर यांनी निषेध नोंदवला आहे. त्याचबरोबर भाजपा नेते राम कदम यांनीही महाराष्ट्र सरकारला निर्लज्ज सरकार म्हणत या निर्णयाचा निषेध केला आहे. “महाराष्ट्र सरकारच्या निष्काळजीमुळे आज मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात फेटाळून लावले गेले. फक्त आणि फक्त वसुलीमध्ये व्यस्त असणाऱ्या ह्या सरकारकडून मराठा समाजाची घोर निराशा केली गेली. आता ह्या सरकारला जोडेच मारावे लागतील.” असा संताप  व्यक्त करत राम कदम यांनी ट्विट केले  आहे.

त्याचबरोबर भाजपा नेते राम कदम यांनीही महाराष्ट्र सरकारला निर्लज्ज सरकार म्हणत या निर्णयाचा निषेध केला आहे. “महाराष्ट्र सरकारच्या निष्काळजीपणामुळे आज मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात फेटाळून लावले गेले. फक्त आणि फक्त वसुलीमध्ये व्यस्त असणाऱ्या ह्या सरकारकडून मराठा समाजाची घोर निराशा केली गेली. आता ह्या सरकारला जोडेच मारावे लागतील.” असा संपत व्यक्त करत राम कदम यांनी ट्विट केले केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button