…तर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील मदरसे बंद करण्याचे धाडस दाखवावे, भाजपचे आव्हान

Atul Bhatkhalkar bjp-congratulate-cm-uddhav-thackeray

मुंबई : लॉकडाऊनपासून राज्यातील मंदिरे बंद असून ती सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांनी अदयाप कुठलाही निर्णय घेतलेला नाही. यावरून राज्यपालांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केला होता. तर उद्धव ठाकरे यांनीही राज्यपालांना जोरदार प्रत्युत्तर दिले होते. हिंदूत्व सिद्ध करण्यासाठी आम्हाला कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही, असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले होते. आणि याच मुद्द्याला पुढे करून भाजपचे आमदार अतुल भातखळकर (Atul bhatkhalkar) यांनी उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली आहे.

हिंदूत्व सिद्ध करण्यासाठी आम्हाला कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही असं म्हणणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी धर्मांध शिक्षण देणारे राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याचे धाडस दाखवावे, अशी मागणी भातखळकर यांनी केली आहे. महाराष्ट्रातील मदरस्यांची संख्या वाढविण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो. त्यातून कोणतेही आधुनिक शिक्षण न देता केवळ एका विशिष्ट धर्माचे शिक्षण दिले जाते. राज्यातील करदात्यांच्या पैशावर चालणारे हे प्रकार अत्यंत चूक आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील मदरसे आणि तेथील मौलवींना दिली जाणारी आर्थिक मदत तात्काळ थांबवावी. तसेच मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्वरूपात थेट मदत द्यावी, अशी मागणी अतुल भातखळकर यांनी केली.

शिया वक्फ बोर्डाचे चेअरमन वसीम रिजवी यांनी तर मदरस्यांना आतंकवादी संघटनाकडून सुद्धा पैसे पुरवले जात असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे सर्व राज्यांनी मदरसांवर बंदी घालून मुस्लिम विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण देण्याची सोय करावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. तसेच कोणाच्याही दबावाखाली न येत धाडसी निर्णय घ्यावा, अशी मागणी सुद्धा अतुल भातखळकर यांनी केली.

काल आसाम सरकारने राज्यातील सर्व सरकारी मदरसे बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचे अतुल भातखळकरांनी स्वागत करत आसाम सरकारचे अभिनंदनही केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER