‘हिंदू’ शब्द वगळल्याने भाजपाचा आक्रमक पवित्रा; परीक्षा फॉर्ममध्ये उल्लेख करा, अन्यथा…

Atul Bhatkalkar-CM Thackeray

मुंबई :- दहावी आणि बारावीच्या परीक्षा फॉर्ममध्ये ‘हिंदू’ शब्द वगळल्याने भाजप नेते आक्रमक झाले आहेत. ठाकरे सरकारने हिंदू शब्दावरच फुली मारली आहे. सरकारला हिंदू शब्दाचे वावडे आहे, असा आरोप मुंबई भाजपचे प्रभारी आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkalkar) यांनी ठाकरे सरकारवर केला.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यात येत आहेत. या परीक्षा फॉर्मममध्ये धर्माच्या रकाण्यात हिंदू शब्द वगळण्यात आला आहे. त्याऐवजी अल्पसंख्याकेतर (नॉन-मायनॉरिटी) असा उल्लेख केल्याचा आरोप अतुल भातखळकर यांनी केला आहे. याच मुद्द्याला घेऊन त्यांनी ठाकरे सरकारला (Thackeray Govt.) घेरले आहे.

“राज्यात मंदिरे सुरू करण्यासाठी तब्बल सहा महिने उशीर झाला. आषाढी वारीसाठी देण्यात आलेल्या बसेसच्या बदल्यात भाडे आकारण्यात आले. राज्यात हिंदूंच्या साधूंचे हत्याकांड झाले. या हत्याकांडातील आरोपींविरोधात कारवाई करण्यात आलेली नाही. त्यानंतर आता ठाकरे सरकारने हिंदू शब्द वगळला आहे. ” असं भातखळकर म्हणाले. तसेच, ठाकरे सरकार काहींना खूश करण्यासाठी आणि आपली मतपेटी सांभाळण्यासाठी सतत हिंदूविरोधी निर्णय घेत आहे, असा आरोपही भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर ट्विटरच्या माध्यमातून केला.

ही बातमी पण वाचा : शिवसेनेला भोपळा? विधान परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पारड्यात ३ जागा  

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER