‘काही मंत्र्यांचे नव्हे तर संपूर्ण मंत्रिमंडळाची कपात केली पाहिजे’, भाजप नेत्याचा राऊतांना

Sanjay Raut & Atul Bhatkhalkar

मुंबई : “कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस आवळत चालला आहे. मुख्यमंत्री पोकळ घोषणा व कोट्यांच्या पलीकडे काही करताना दिसत नाही. राज्यात कुचकामी सरकार काम करत आहे. त्यामुळे काही मंत्र्यांचे नव्हे तर संपूर्ण मंत्रिमंडळचं कपात केलं पाहिजे,” असा टोला भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर लगावला आहे. “कामगार कपातीप्रमाणे मुख्यमंत्र्यांवर ‘मंत्रीकपात’ करण्याची वेळ येईल,” अशी भीती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’च्या रोखठोक सदरात व्यक्त केली होती. त्यावरुनच भाजपाचे आमदार अतुल भातखळकर हा टोला लगावला.

राज्यातील सरकार बिनकामाचे आहे. हे सरकार काहीही काम करत नाही. त्यामुळे या मंत्रिमंडळातील काही मंत्री नव्हे तर संपूर्ण मंत्रिमंडळाची कपात करायला हवी. त्याने लोकांना काहीही फरक पडत नाही. हे सरकार कुंभ करण्याच्या झोपेत आहे. तसेच ते मूक बहिरे आणि आंधळ्यांचं सरकार आहे. संजय राऊत ज्या पद्धतीने काल राज्यपालांना झुकून भेटले. त्यामुळे ते किती बिनकण्याचे आहेत हे दिसून येते, अशी टीकाही भातखळकरांनी केली. तसेच आम्हाला काही सूचना द्यायच्या असल्यास मुख्यमंत्री आम्हाला भेटण्यासाठी वेळ देत नाही, त्यामुळे जनतेची प्रश्न आम्हाला राज्यपालांकडे मांडावी लागतात, असेही अतुल भातखळकर यांनी स्पष्ट केले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER