‘राज्यपालांना विमानातून उतरवणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी राज्यघटना शिकवू नये’, भाजपची टीका

मुंबई :- गेल्या सहा महिन्यांपासून विधान परिषदेसाठी राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा मुद्दा प्रलंबित आहे. परंतु, राज्यपाल सचिवालयात विधानपरिषद नामनियुक्त सदस्यांची यादी उपलब्ध नाही, अशी माहिती राजभवनाच्यावतीने माहिती अधिकार (आरटीआय) (RTI) अर्जावर देण्यात आली आहे. त्यावर शिवसेनेने आजच्या सामानातून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्यावर निशाणा साधला. एक फाईल महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ एकमताने राज्यपालांकडे पाठवते व राज्यपाल सहा महिने त्यावर निर्णय घेत नाहीत. यास मंदगती म्हणावे की आणखी काय? असा सवाल शिवसेनेनं (Shivsena) केला आहे. १२ जागा सहा महिने रिकाम्या ठेवून राज्यपालांनी बेकायदेशीर काम केले आहे, असेही अग्रलेखात म्हटलं आहे. शिवसेनेने केलेल्या या आरोपावर आता भाजपनेही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

१२ आमदारांची नियुक्ती थांबवणं ही घटनेची पायमल्ली, असे सामानात म्हटल्या गेले आहे. जनतेने दिलेल्या कौलाची पायमल्ली करून विश्वासघाताने सरकार स्थापन करणाऱ्या आणि राज्यपालांना विमानातून उतरवणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी राज्यपालांना राज्यघटना शिकवू नये, असे ट्विट भाजपचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी केले आहे.

तर दुसऱ्या ट्विटमध्ये भातखळकर यांनी कोरोना लसीच्या (Corona Vaccine) मुद्द्यावरुन मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले. मुख्यमंत्री म्हणतायत लस नाही म्हणून खरेदी नाही. किती खोटं बोलताय मुख्यमंत्री. मुंबईतील बड्या खासगी हॉस्पिटलना लस मिळते आणि सरकारला मिळत नाही असे कसे? अनेक राज्यांनी एकेक कोटी लसी विकत घेण्यासाठी आगाऊ रक्कम दिली आहे, तुम्ही केंद्र सरकारकडे तोंड वेंगाडण्याच्या पलिकडे काय केले?, असा खोचक प्रश्नही भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button