काँग्रेसचे ‘टूलकिट’ खलिस्तान्यांच्या टूलकिटपेक्षा खतरनाक; अतुल भातखळकर यांची टीका

Atul Bhatkhalkar - Maharastra Today
Atul Bhatkhalkar - Maharastra Today

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या प्रतिमेला बदनाम करण्यासाठी काँग्रेसने (Congress) एक टूलकिट तयार केले, असा आरोप भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा (Sambit Patra) यांनी केल्यानंतर भाजपाचे इतर नेतेही मैदानात उतरले आहेत. यासाठी काँग्रेसवर टीका करताना आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) म्हणाले की, काँग्रेसचे टूलकिट खलिस्तान्यांच्या टूलकिटपेक्षा कमी खतरनाक नाही. भातखळकर यांनी ट्विट केले – काँग्रेसचे टूलकिट खलिस्तान्यांच्या टूलकिटपेक्षा कमी खतरनाक नाही. ‘इंडियन व्हायरस, मोदी व्हायरस, असे शब्द सोशल मीडियातून व्हायरल करा’, असे आदेश काँग्रेस कार्यकर्त्यांना दिले आहेत.

सत्तेसाठी काँग्रेस देशद्रोह्यांना पुढे करू शकते. वेळ आल्यास देशद्रोहही करू शकते. दुसऱ्या ट्विटमध्ये ते म्हणतात – भारताचा नंबर-१ शत्रू असलेल्या चीनशी काँग्रेस पक्षाचा २००८ पासून करार आहे. त्यामुळे सगळे जग जरी कोरोनाला चायनीज व्हायरस म्हणत असले तरी काँग्रेस मात्र याला इंडियन व्हायरस म्हणणार. मोदी व्हायरस म्हणणार. चीनने राजीव गांधी फाउंडेशनला भरभरून देणग्या दिल्या आहेत त्याची परतफेड नको? याबाबतचे संबित पात्रा यांचे मूळ ट्विट – महामारीच्या काळात काँग्रेसने ‘टूलकिट’च्या माध्यमातून सरकारला घेराव घालण्यासाठी अनेक मार्गांनी देशात गोंधळ निर्माण करून राजकीय फायदा उठविण्याचा प्रयत्न केला.

राहुल गांधी यांनी महामारीचा उपयोग पंतप्रधान मोदींच्या प्रतिमेला डागाळण्याची संधी म्हणून केला. कोरोनातील नव्या व्हायरसचे नाव मोदी व्हायरस ठेवण्याच्या सूचना कॉंग्रेस कार्यकर्त्यांना देण्यात आल्या. काँग्रेसने परदेशी पत्रकारांच्या मदतीने भारताची बदनामी करण्यात काहीही कसूर बाकी ठेवली नाही.


Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button