
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या कार्यशैलीबद्दल टीका केल्याने राज्यातील काँग्रेसचे नेते संतापले होते. थोडी कुरकूर केली. काँग्रेसच्या नेत्या आणि महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी, काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर टीका-टिप्पणी करणे टाळा. सर्व पक्षांनी आघाडी धर्माचे पालन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
राहुल गांधी यांच्याबाबत विधाने सहन केली जाणार नाहीत. काँग्रेसचे नेतृत्व अतिशय स्थिर आहे, निर्णयक्षम आहे. राज्यातील महाविकास आघाडी हा त्याच निर्णयक्षमतेचा परिपाक आहे, असे त्यांनी म्हटले होते. सध्याही कुरबुरी सुरूच आहे. यात काँग्रेसची वारंवार कुचंबणा होते. यावरून भाजपाचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी काँग्रेसला (Congress) टोमणा मारला. लग्नात वाढप्याची जी भूमिका असते तीच भूमिका महाभकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसची आहे. राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारला एक वर्ष पूर्ण झाले.
आता शासकीय महामंडळे, मंडळे, समित्यांवरील राजकीय नियुक्त्या लवकर झाल्या पाहिजेत, असा आग्रह काँग्रेसने धरला होता. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला घाई नसेल तर काँग्रेसचा कोटा निश्चित करून द्या, त्यानुसार आमच्या नियुक्त्या केल्या जातील, असे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील म्हणालेत. राज्यपाल नामनिर्देशित विधान परिषदेवरील नियुक्त्यांसाठी लोकसभा निवडणुकीत एका काँग्रेस नेत्याच्या विरोधात निवडणूक लढविलेल्या उमेदवाराची राष्ट्रवादी काँग्रेसने शिफारस केल्याबद्दल पाटील यांनी नाराजी व्यक्त केली होती. राज्य सरकारमधील तीनही पक्षांनी आघाडीचा धर्म पाळला पाहिजे, असे ते यापूर्वीही पत्रकार परिषदेत म्हणाले होते.
लग्नात वाढप्याची जी भूमिका असते तीच भूमिका महाभकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसची आहे…🤓
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 18, 2020
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला