एकाच शब्दाचा वारंवार उल्लेख करत भाजपची मुख्यमंत्र्यांवर मिस्कील टीका

Atul Bhatkhalkar -CM Uddhav Thackeray

मुंबई : कोरोनाचा (Corona virus) वाढता संसर्ग रोखण्यासाठी सध्या राज्यात लसीकरण (corona-vaccination) मोहीम अधिक वेगाने राबवण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून सुरु आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह महाविकास आघाडीतील अनेक मंत्र्यांकडून लसींचा तुटवडा असल्याचं सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनीही महाराष्ट्राला मिळणाऱ्या कोरोना लसीचं प्रमाण कमी असल्याचं म्हटलं आहे. यावरुन भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत एकाच शब्दाचा वारंवार उल्लेख करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर मिस्कील टीका केली. ठाकरे यांच्या संवादशैलीवरुन भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी खोचक ट्वीट केलं आहे.

“लस उपलब्ध नाही कारण साठा नाही. साठा आहे पण लसीकरण होणार नाही.याचा अर्थ असा नाही की लसीकरण बंद आहे. लसीकरण सुरूच आहे. सर्वांना लस मिळेल. याचा अर्थ कुणीही जाऊन लस घेऊ शकतो असा नाही. नोंदणी करा मग लस मिळेल. पण नोंदणी केली तरी लस मिळेलच असं नाही. पक्षाचे मुख्यमंत्री”, असं ट्वीट करुन भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केलाय. भातखळकरांच्या या टीकेला शिवसेनेना कुठल्या शैलीने प्रत्युत्तर देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

Disclaimer:-बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button