मोदींना विनंती केल्यावर तुम्हाला विधानपरिषदेत जाता आलं, भाजपचा मुख्यमंत्र्यांना टोला

Atul Bhatkhalkar - CM Uddhav Thackeray

मुंबई : मुंबई महापालिकेत गुरूवारपासून हेरिटेज वॉक सुरु करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं आज उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी ‘मी विधानसभेत तुमच्या मुळे आणि तुम्ही महापालिकेत आमच्यामुळे’, असं विधान केलं होत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यावरुन भाजपचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी जोरदार टोला लगावला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोनवरुन विनंती केल्यानंतर विधान परिषदेत तुम्ही गेलात. त्यामुळे तुम्हाला विधानसभेत जाता येतं’ अशा शब्दात भातखळकरांनी उद्धव ठाकरे यांना टोला हाणला आहे. “मी विधानसभेत तुमच्यामुळे; तुम्ही महापालिकेत आमच्यामुळे: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. विधानसभेत? कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढवली आणि जनतेने तुम्हाला कधी निवडून दिलं? मोदींना फोनवर विनंती केल्यानंतर विधान परिषदेवर गेलात तुम्ही. त्यामुळे विधानसभेत जाता येते तुम्हाला,” अशा शब्दात भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER