संजय राठोड यांची हकालपट्टी करा, भाजपची जोरदार मागणी

मुंबई :- पुण्यात आत्महत्या करणारी तरुणी पूजा चव्हाण हिच्या प्रकरणात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारमधील मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांचं नाव समोर आले आहे. त्यानंतर भाजपने (BJP) आक्रमक भूमिका घेतली आहे. या राज्यात महिला सुरक्षित तर नाहीतच. पण राज्यातील महिला या मंत्र्यांपासूनसुद्धा सुरक्षित नाही. वनमंत्री संजय राठोड यांची मंत्रिमंडळातून तत्काळ हकालपट्टी करावी. पूजा चव्हाण (Pooja Chavan) आत्महत्या प्रकरणात (Sucide Casr) एसआयटी स्थापन करावी. या समितीमध्ये निवृत्त न्यायमूर्ती, पोलीस अधिकारी असावेत, अशी आग्रही मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी उचलून धरली आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजपने वनमंत्री संजय राठोड यांचे नाव घेतल्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. याच प्रकरणावर भातखळकर ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारचा समाचार घेतला. या प्रकरणात समोर आलेल्या ऑडिओ क्लीप ताब्यात घेतल्या पाहिजेत. त्या ऑडिओ क्लिप फॉरेन्सिककडे पाठवून तो आवाज नेमका कोणाचा आहे?, हे तपासले पाहिजे. लॅपटॉही स्कॅन केला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, या सर्व तपासाच्या गोष्टी असून, गुन्हेगारांना वाचवण्याचं पाप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.

कोणत्याही विषयांवर अग्रलेख लिहिणारे सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) आता कुठे गेलेत?, असा सवाल यांनी केला आहे. एम.जे. अकबरांवर अग्रलेख लिहिणारे राऊत आता का अग्रलेख लिहित नाहीत? असा सवाल अतुल भातखळकर यांनी विचारला. ज्या संजय राऊतांनी एम.जे. अकबरांवर आरोप झाले तेव्हा अग्रलेख लिहिले. त्यानंतर भाजपने त्यांचा राजीनामा घेतला. आता संजय राऊत कुठे गेले आहेत. हा त्यांचा दुतोंडीपणा आहे, अशी घणाघाची टीका करत राऊतांनी या प्रकरणावर बोलायला हवे, असं भातखळकर म्हणाले.

ही बातमी पण वाचा : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर संजय राऊतांचा सावध पवित्रा, म्हणाले…

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER