
मुंबई : शिवसेना आणि भाजपा यांच्यातील दुरावा वाढला आहे. आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) स्मारकाच्या भूमिपूजनाचे आमंत्रण दिले नसल्याचे समोर आले आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच ठाकरे स्मारकाची घोषणा झाली होती. त्या काळात स्मारकासाठी अनेक परवानग्या मिळाल्या.
फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन या स्मारकाची घोषणा केली होती. त्यानंतर कागद हस्तांतरण कार्यक्रम पार पडला होता. मात्र, आता या स्मारकाचे भूमिपूजन होत असताना फडणवीसांना या कार्यक्रमापासून दूर ठेवले आहे. यावरून भाजपाने शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. दरम्यान, भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट केले आहे.
“सोडलेल्या हिंदुत्वाचे आणि कोत्या मनाचे पुन्हा एकदा दर्शन… निमंत्रण पत्रिकेतून ‘हिंदुहृदयसम्राट’ गायब, MMRDA चे मंत्री एकनाथ शिंदे गायब, ज्यांच्यामुळे शिवसेनाप्रमुखांचे स्मारक शक्य झाले ते विरोधी पक्षनेते गायब… नावे फक्त आयत्या पिठावर रेघोट्या मारणाऱ्यांची…” असे ट्विट करत भातखळकर (atul bhatkhalkar) यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
सोडलेल्या हिंदुत्वाचे आणि कोत्या मनाचे पुन्हा एकदा दर्शन…
निमंत्रण पत्रिकेतून ‘हिंदुहृदयसम्राट’ गायब, MMRDA चे मंत्री एकनाथ शिंदे गायब, ज्यांच्यामुळे शिवसेनाप्रमुखांचे स्मारक शक्य झाले ते विरोधी पक्षनेते @Dev_Fadnavis
गायब… नावे फक्त आयत्या पिठावर रेघोटया मारणाऱ्यांची…. pic.twitter.com/qhBmCueWNy— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 31, 2021
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला