शरद पवारांचा दुटप्पीपणा महाराष्ट्रातील जनता बघतेय; राष्ट्रवादीला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही ; भाजप नेत्याची टीका

atul-bhatkhalkar-criticize-sharad-pawar

मुंबई : बलात्काराच्या आरोपामुळे अडचणीत आलेल्या सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याविरोधात विरोधकांनी हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे . धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपा (BJP) महिला आघाडी राज्यभरात आंदोलन करणार आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी धनंजय मुंडे यांच्या प्रकरणात सावध भूमिका घेतल्याने भाजपा आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी जोरदार निशाणा साधला आहे.

अतुल भातखळकर म्हणाले की, धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर आहेत तेव्हा त्याची चौकशी करून निर्णय घेऊ असं आधी म्हणायचं आणि नंतर त्यांनी राजीनामा देण्याची गरज नाही असं म्हणून पाठीशी घालायचं हा शरद पवार यांचा दुटप्पीपणा महाराष्ट्राची जनता बघत असून ती राष्ट्रवादीला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा टोला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांना लगावला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER