
मुंबई : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi) वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ‘सामना’च्या माध्यमातून अभिनंदन मुलाखत घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. या मुलाखतीवरून भाजपने (BJP) मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे. मुख्यमंत्र्यांचा मूळ हेतू राज्यातील विरोधकांना धमकावण्याचाच आहे, असा आरोप भाजपाच्या नेत्यांकडून केला जात आहे. एकीकडे सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त सत्ताधाऱ्यांकडून आपल्या कामांची यादी सादर केली जात आहे. तर दुसरीकडे विरोधकांकडून सरकारला जाब विचारत टीकाही सुरू आहे. “थुकरट मुलाखती, स्थगित्या नी यू-टर्न, बघ माझी आठवण येते का…,” असं म्हणत भाजपा नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी सरकारवर निशाणा साधला.
“विचार वर्षभरातलं माझं एकतरी ठोस काम जनतेच भलं करणारं, मेंदूला ताण देत घे वर्षभराचा धोंडोळा, फुफ्फुसात पुरेशी हवा भर, मोठासा उसासा घे, स्मरल्या जर तोंडाच्या वाफा, पकाऊ FB लाईव्ह, बाष्कळ कोट्या, फालतू विनोद, सूडाचे कंड, थुकरट मुलाखती, स्थगित्या नी यू-टर्न, बघ माझी आठवण येते का…,” अशी कविता करत भातखळकर यांनी सरकारला टोला लगालवला. भातखळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून यावर भाष्य केलं.
विचार वर्षभरातलं
माझं एकतरी ठोस काम
जनतेच भलं करणारं,
मेंदूला ताण देत
घे वर्षभराचा धोंडोळा,
फुफ्फुसात पुरेशी हवा भर,
मोठासा उसासा घे,
स्मरल्या जर
तोंडाच्या वाफा,
पकाऊ FB लाईव्ह,
बाष्कळ कोट्या,
फालतू विनोद,
सूडाचे कंड,
थुकरट मुलाखती,
स्थगित्या नी यू-टर्न,
बघ माझी आठवण येते का… pic.twitter.com/N3lJZ1r73w— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) November 27, 2020
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला