मंत्रालयात न जाणाऱ्या घरकोंबड्यांसाठी कोणती नियमावली?

- भातखळकरांचा मुख्यमंत्र्यांना टोमणा

atul bhatkhalkar-CM Uddhav Thackeray

मुंबई : कार्यालयात उशिरा येणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना नव्या वर्षात चांगलाच चाप बसणार आहे. महिन्यातून केवळ दोन वेळाच जास्तीत जास्त दीड तास उशिरा येण्याची सवलत मिळेल. तिसऱ्या ‘लेटमार्क’साठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची रजा वजा करण्यात येणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा शासन निर्णय (जीआर) गुरुवारी जारी केला आहे. यावर मंत्रालयात न जात घरून काम करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना भाजपाचे नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी टोमणा मारला – मंत्रालयात (Mantralay) न जाणाऱ्या घरकोंबड्यांसाठी सरकारने काही नियमावली जाहीर केली आहे का ?

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर कोरोनाच्या साथीमुळे बराच काळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) घराच्या बाहेर पडले नाहीत. यासाठी त्यांच्यावर विरोधी पक्षांनी सतत टीका केली आहे. त्याच अनुषंगाने भातखळकर यांनी ट्विट केले –

नियम
मंत्रालयीन विभागांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील शासकीय विभाग, कार्यालयांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सकाळी कार्यालयात पोहचण्यासाठी एका महिन्यात दोन वेळा जास्तीत जास्त दीड तास उशिरा येण्याची सवलत असेल. त्यानंतर उशिरा येण्यासाठी एक नैमित्तिक रजा वजा करण्याचे आदेश विभागाने दिले आहेत; शिवाय, एकाच महिन्यातील तीनपेक्षा अधिक वेळा उशिरा उपस्थितीसाठी म्हणजेच सहाव्या, नवव्या, आदीसाठी प्रत्येकी एक नैमित्तिक रजा वजा करावी. नैमित्तिक रजा शिल्लक नसेल तर अर्जित रजा वजा करावी. ज्यांची अर्जित रजा शिल्लक नसेल, त्यांची असाधारण रजा (विनावेतन) मंजूर करावी. रजेची सवलत महिन्यातील केवळ पहिल्या नऊ उशिरा उपस्थितीसाठी असेल. त्यापुढील उशिरासाठी असाधारण (विनावेतन) रजा मंजूर करण्यात यावी. परिवर्तित रजा ही केवळ वैद्यकीय कारणास्तव मंजूर करण्यात येत असल्याने कोणत्याही परिस्थितीत उशिरा उपस्थितीसाठी ही रजा मंजूर करण्यात येऊ नये, अशा सूचना सामान्य प्रशासन विभागाने दिल्या आहेत.

या वर्षी फेब्रुवारीमध्ये जारी केलेल्या आदेशानुसार शासकीय कार्यालयांची वेळ ही सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ आहे. त्यामुळे गट-अ ते गट-क च्या अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कार्यालयीन उशिरा उपस्थिती ही दीड तास म्हणजेच सकाळी ११.१५ वाजेपर्यंत ग्राह्य धरण्यात यावी. शिपाई संवर्गातील कर्मचाऱ्यांची वेळ सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.३० असल्याने त्यांच्या बाबतीत उशिरा उपस्थिती ही सकाळी ११.०० वाजेपर्यंत ग्राह्य धरण्यात येणार आहे. मात्र, रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे किंवा कर्मचाऱ्यांच्या नियंत्रणाबाहेरील आकस्मिक घटनेमुळे जे कर्मचारी उशिरा येतील, त्यांची उशिरा उपस्थिती न मांडता खातरजमा करून ती माफ करावी, असे या आदेशात म्हटले आहे.

ही बातमी पण वाचा : नाणारच्या जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार होणार रद्द – विनायक राऊत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER