संजय राऊत यांचा अर्थशास्त्राशी काडीचाही संबंध नाही असेल तर टक्केवारीशी, अतुल भातखळकरांची टीका

मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) मुखपत्र सामनाने आज इंधन दरवाढीवरून केंद्र सरकारवर (Modi Govt) टीका करणारा अग्रलेख लिहिला यावरून संजय राऊत यांचावर टीका करताना भाजपाचे नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) म्हणालेत – शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांचा अर्थशास्त्राशी काडीचाही संबंध नाही. असेल तर टक्केवारीशी संबंध आहे.

भातखळकर म्हणालेत, पेट्रोल-डिझेल दरवाढीवरून संजय राऊत यांना राम मंदिराचा चंदा आठवला. काँग्रेसचा वाण नाही पण गुण त्यांना लागला. राऊत खोट बोलून लोकांना भडकावण्याचे काम करत आहेत. पेट्रोल-डिझेलच्या दरात २६ रुपये व्हॅट राज्य सरकारचा आहे. तो आधी कमी करा, इंधनाचे दर आपोआप कमी होतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER