‘सरकारी जावई शरजीलवर कारवाई करण्यास भाग पाडले म्हणून गावडेंना अटक’

Atul Bhatkhalkar

मुंबई : भाजप (BJP) युवामोर्चा सचिव ऍड. प्रदीप गावडेंच्या (Adv. Pradeep Gawade) बेकायदेशीर अटकेवरून आता भाजपने महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर टीका करायला सुरुवात केली आहे. महाविकास आघाडी सरकार पोलीस बळाचा वापर दडपशाहीसाठी करत असल्याची टीका भाजपने केली आहे. भाजपचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी ट्विट करत महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले.

ॲड. प्रदिप गावडे यांच्यावरील ठाकरे सरकारचा राग समजण्यासारखा आहे. एल्गार पिलावळीतील माथेफिरू शरजील उस्मानीवर झालेल्या कारवाईत गावडे यांची महत्वाची भूमिका होती. आता थेट सरकारी जावई अडचणीत आल्यामुळे जाणते आणि मुख्यमंत्री दोघेही चवताळणे स्वभाविकच आहे. विरोधकांना आणि टीकाकारांना दडपण्यासाठी ठाकरे सरकारची कार्यक्षमता अचानक उसळून येते. बाकी वादळ असो वा महामारी मुख्यमंत्र्यांसह अवघे सरकार आरामखुर्चीवर बसलेले असते. ऍड. गावडेंवरील द्वेषपूर्ण कारवाईचा आम्ही धिक्कार करतो, असे भातखळकर यांनी म्हटले आहे.

तर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनीही गावंडेंवर केलेल्या कारवाईवरुन महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. भाजपचे पदाधिकारी ॲड. प्रदिप गावडे यांनी सोशल मिडीयावर आपली भावना व्यक्त केल्याने मुंबई पोलिसांनी बेकायदेशीरपणे अटक केली. पण

५ महिन्यांपुर्वी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख़वर कायदेशीर बलात्काराचा गुन्हा दाखल असूनही त्याला अटक करायच धारीष्ट्य पोलीस महासंचालकांनी अद्याप दाखवलं नाही

वाह…..रे अभिव्यक्तिस्वातंत्र्य, असे म्हणत चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button