ठाकरे सरकार आरेची जागा बिल्डरांच्या गळ्यात घालण्याचा कट रचताहे – अतुल भातखळकर

Atul Bhatkhalkar

मुंबई :- मुंबईतील मेट्रो कारशेडच्या (Metro Car Shed in Mumbai) जागेवरून काही दिवसांपूर्वी राज्यात चांगलेच राजकीय वातावरण चर्चेत होते. राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी मेट्रो कारशेड प्रकल्प प्रतिष्ठेचा विषय बनवला होता. त्यानंतर हा प्रकल्प मेट्रो कारशेड प्रकल्प आरेमधून हलवण्यात आला. पर्यावरणप्रेमी म्हणून आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची प्रतिमा पुढे आली. आता याच ठाकरे सरकारने (Thackeray govt) आरेमध्येच झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प जाहीर केला आहे. या वादाला आणखी सुरुवात झाली आहे.

या मुद्यावरून भाजपा आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. “मुंबईकरांच्या हक्काच्या मेट्रोचे कारशेड आरेमधून हलविणाऱ्या ठाकरे सरकारने आता आरेमध्येच झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प जाहीर केला आहे. असे करून ठाकरे सरकार आरेची जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा  कट रचत आहे. आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारचे पर्यावरणप्रेम हे पूर्णतः बोगस आहे.” अशा शब्दांत अतुल भातखळकर यांनी आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र सोडले आहे.

आरेमध्ये बांधकाम करण्यास उच्च न्यायालयाची मनाई आहे. असे असताना ठाकरे सरकारने आरेमध्ये तब्बल ३२ हजार ३१० वर्गफुटाच्या जागेवर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प जाहीर केला. हा परिसर परि-संवेदनशील क्षेत्र आहे. आर्थिक फायद्यासाठी ही जागा बिल्डरांच्या घशात घातली जात आहे, असे भातखळकर म्हणाले. याविरोधात भारतीय जनता पार्टी मोठे जन आंदोलन उभे करेल आणि गरज पडल्यास उच्च न्यायालयातसुद्धा जाणार, असा इशारा अतुल भातखळकर यांनी दिला आहे.

ही बातमी पण वाचा : आदित्य ठाकरे यांचा ढोंगी चेहराही आता उघड झाला ; अतुल भातखळकरांची टीका 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button