मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपची धुरा अतुल भातखळकर यांच्याकडे

Atul Bhatkhalkar

मुंबई : येत्या २०२२ मध्ये संपन्न होणाऱ्या मुंबई महापालिका (BMC) निवडणुकीची धुरा भाजपने कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांच्याकडे सोपवली आहे. भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांनी आज झालेल्या मुंबई भाजपा कार्यकारिणी बैठकीत अतुल भातखळकर यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केली.

भाजपाचे तडफदार नेते देवेंद्रजी फडणवीस तसेच प्रदेशाध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्याचा मी पूर्ण क्षमतेने प्रयत्न करेन, असा विश्वास भातखळकर यांनी बोलून दाखवला. आगामी महापालिका निवडणुकीत सर्वच्या सर्व २२७ जागा स्वबळावर लढणार असल्याचे भाजपने जाहीर केलेले आहे. अत्यंत चुरशीच्या होणाऱ्या या निवडणुकीत पक्षाला घसघशीत विजय मिळवून देण्याचे आव्हान आमच्यासमोर असेल. त्यासाठी पक्ष नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली संघटनेला सज्ज करण्यासाठी पूर्ण क्षमतेने काम करू, अशी ग्वाही भातखळकर यांनी दिली. मुंबईकरांना आम्ही भ्रष्टाचार आणि अकार्यक्षम सत्ताधाऱ्यापासून मुक्ती देऊ आणि पूर्ण बहुमताने भाजपाचा महापौर निवडून आणू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तसेच मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज माझी नियुक्ती जाहीर केली. आमचे नेते देवेंद्र फडणवीस तसेच प्रदेशाध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली स्वबळावर भाजपचा महापौर आणू, असा मला विश्वास आहे, असंही ट्विट करत त्यांनी सांगितलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER