सरकारी तिजोरीतून वडिलांचे स्मारक बांधणाऱ्या उद्धव ठाकरेंना अमोल कोल्हे यांनी ज्ञानामृत पाजावं : भाजप नेत्याची टीका

Maharashtra Today

मुंबई : देशभरासह राज्यातही कोरोनाने थैमान घातले आहे . यापार्श्वभूमीवर राज्यासह देशाची आर्थिक स्थिती नाजूक बनत चालली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने नव्या संसद भवनावर खर्च न करता ऑक्सिजन प्लांट, कोव्हिड सेंटरवर खर्च करावा, असा सल्ला शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी दिला होता. त्यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे उदाहरण देत महाविकास आघाडी सरकारवर टिका केली आहे.

देश भयानक परिस्थितीशी झुंजतोय, देशाला नव्या संसद भवनाची नाही तर ऑक्सिजन प्लांट, कोव्हिड सेंटरची जास्त गरज आहे, असं तत्वज्ञान पाजळणाऱ्या अमोल कोल्हे यांनी हे ज्ञानामृत या भयानक परिस्थितीत सरकारी तिजोरीतून 400 कोटी खर्चून वडिलांचे स्मारक बांधणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पाजावं, असं टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे

दोन महिन्यापूर्वी बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्धाटन झाले होते .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button