देशातील आकर्षन असलेला गुरूव्दारा तख्त सचखंड साहिब दशहरा हल्लाबोल कार्यक्रम उत्साहात

हजारों भाविकांनी साजरा केला पारंपरिक दसरा सण

नांदेड / प्रतिनिधी :- येथील गुरुद्वारा तखत सचखंड साहिब तर्फे आयोजित दशहरा हल्ला महल्ला सण मंगळवारी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. सायंकाळी पारंपरिक हल्ला बोल प्रात्यक्षिक आणि पंजाब येथून उपस्थित झालेल्या सशस्त्र दलांमुळे भाविकांचा आनंद द्वगुणीत झाला. बोले सो निहाल सतश्री अकाल जयघोषाने एकूणच वातावरण धार्मिक होऊन गेले.

दसरा सणानिमित्त मंगळवारी (दि. 8) पहाटे 2 वाजता पासून भाविकांनी गुरुद्वारा दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. सकाळी पारंपरिकपणे दसरा सण विशेष कीर्तन झाले. तसेच श्री गुरु ग्रंथसाहिबांचे पाठ आणि कथा पार पडली. सकाळी भाविकांसाठी लंगर प्रसाद कार्यक्रम सुरु करण्यात आले. मुख्य लंगर मध्ये हजारों भाविकांनी प्रसाद ग्रहण केले. दुपारी दसरा निमित्त सुरु करण्यात आलेल्या दहा दिवसीय श्री चंडीसाहेबाच्या पाठाचे समापन करण्यात आले. पाश्च्यात सशस्त्रपूजन पूजन आणि इतर पारंपरिक धार्मिक विधी पूर्ण करण्यात आले. वेळी गुरुद्वाराचे मुख्य जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी, मीत जत्थेदार संतबाबा ज्योतींदरसिंघजी, हेडग्रंथी भाई काश्मीरसिंघजी, मीत ग्रंथी भाई अवतारसिंघजी शीतल, धुपिया भाई रामसिंघजी यांच्या उपस्थितीत सायंकाळी 4 वाजता दशहरा हल्ला महल्ला नगरकिर्तन मिरवणुकीसाठी अरदास करण्यात आली. अरदास उपरांत नागरिकीर्तन यात्रेस प्रारंभ झाले. यात्रेत निशानसाहेब, गुरु महाराजांचे घोडे, कीर्तन जत्थे, भजन मंडळी, गतका जत्थे, बँड पथक यांचा समावेश होता.

ही बातमी पण वाचा : ग्रथं हेच जिवनाचा अधार असून मन, मेंदू मजबूत करावयाचे झाल्यास पुस्तकांसी मैत्री करा-देविदास फुलारी

वरील यात्रा गुरुद्वारा गेट क्रमांक एक येथून सुरु होऊन गुरुद्वारा मुख्य रास्ता, गुरुद्वारा चौक, महावीर चौक मार्गे हल्लाबोल चौक येथे पोहचली. येथे अरदास केलेल्या नंतर पारंपरिक हल्ला कार्यक्रम सुरु झाले. हल्ला कार्यक्रर्मात निशानसाहेब, घोडे आणि सशस्त्र सैनिकांनी धाव घेतली. यावेळी धार्मिक जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले. हे दृश्य पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येत भाविकांनी रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी गर्दी केली होती. या मिरवणुकीत संतबाबा कुलवंतसिंघजी आणि पंजप्यारे साहिबान यांची प्रमुख उपस्थिती होती. सोबतच गुरुद्वारा लंगरसाहेबचे संतबाबा बलविंदर सिंघजी कारसेवावाले, संतबाबा प्रेमसिंघजी मातासाहेबवाले, संतबाबा गुरदेवसिंघजी, संतबाबा गुरुचरण सिंघजी लंगरावाले रोपड, संतबाबा बलबीर सिंघजीरोप, संतबाबा अवतारसिंघजी, गुरुद्वारा बोर्डाचे सचिव रविंदरसिंघ बुंगाई, बोर्ड सदस्य गुरुचरणसिंघ घडीसाज, सरदुलसिंघ फौजी, गुरमितसिंघ महाजन, मनप्रीतसिंघ कुंजीवाले, जगबीरसिंघ शाहू, भागिन्दरसिंघ घाडीसाज, नौनिहालसिंघ जहागीरदार, गुलाबसिंग कंधारवाले, देवेंद्रसिंघ मोटरवाले, गुरुद्वारा बोर्ड अधीक्षक गुरविन्दरसिंघ वाधवा, सहायक वरिष्ठ अधीक्षक रंजीतसिंघ चिरागीया, सहायक अधीक्षक ठाणसिंग बुंगाई, कनिष्ठ अधीक्षक नारायणसिंघ नंबरदार, हरजीतसिंघ कडेवाले, रवींद्रसिंघ कपूर आणि प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती होती.

भूपिंदर सिंघ मनहास यांच्या शुभेच्छा :
गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष सरदार भूपिंदरसिंघ मनहास आणि उपाध्यक्ष सरदार गुरविन्दरसिंघ बावा यांनी दसरा सणांनिमित्त सर्व साधसंगत, गुरुद्वारा बोर्ड अधिकारी, कर्मचारी आणि सर्व पत्रकार मंडळीस शुभेच्छा दिल्या . दसरा सण सर्वांना भरभरटीचा जाओ अशी सदीच्छा त्यांनी संयुक्तरित्या व्यक्त केली