चौकशीसाठी गुरुवारी हजर व्हा; प्रताप सरनाईक, मुलगा विहंग यांना ईडीचा समन्स

Pratap Sarnaik - Vihang Sarnaik

मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Saranaik) याना ‘टॉप ग्रुप’ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातचौकशीसाठी ईडीकडून समन्स बजावण्यात आला आहे. प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक (Vihang Sarnaik) यांना ईडीन समन्स बजावला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरनाईक पिता-पुत्राला गुरुवारी (३ डिसेंबरला) दुपारी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी सांगण्यात आले आहे. ईडीच्या समन्सला सरनाईक पिता – पुत्रांनी अद्याप काही उत्तर न दिल्याचे कळते.

प्रताप सरनाईक यांचा क्वारटाईनचा कालावधी आज संपणार आहे. २५ नोव्हेंबरला प्रताप सरनाईक याच्या घर आणि कार्यालयावरईडीने धाड टाकली होती. विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घरीही धाड टाकली होती. प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक सोमवारी चाैथ्यांदा ईडीच्या चौकशीसाठी गैरहजर राहिले होते. प्रताप सरनाईक यांचा क्वारंटाइनचा कालावधी संपत असल्याने त्यांनाही पुन्हा ईडीकडून समन्स बजावण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER