सरकारची विशिष्ट प्रतिमा निर्माण करण्याचे प्रयत्न; परराष्ट्रमंत्र्यांचा आरोप

S. Jaishankar

न्यूयॉर्क : “भारतातील विद्यमान सरकारची विशिष्ट प्रतिमा उभी करण्याचे राजकीय प्रयत्न सुरू आहेत. मात्र, बनावट राजकीय प्रतिमा आणि वास्तविक सरकारी नोंदी यांच्यात मोठा फरक आहे.” असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले. ते बुधवारी हूवर इन्स्टिट्यूटने आयोजित केलेल्या ‘भारत : संरक्षण भागीदारी आणि आव्हान’ या विषयावरील ‘बॅटलग्राउंड’ सत्रात बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जनरल एच. आर मॅकमास्टरदेखील (H. R. McMaster) उपस्थित होते.

जयशंकर म्हणाले की, “कोरोना (Corona) साथीमुळे भारत सध्या तणावपूर्ण परिस्थितीत आहे. आम्ही ८० कोटी लोकांना नि:शुल्क अन्न पुरवत आहोत. तसेच ४० कोटी लोकांच्या बँकेत पैसे जमा करत आहोत. अमेरिकेच्या अडीचपट लोकसंख्येला अन्न पुरवणे आणि अधिक लोकांना निधी देणे हे कोणाचेही नाव न घेता केले आहे. यामध्ये भेदभाव केला जात नाही.” असे जयशंकर म्हणाले.

बैठकीत महत्त्वाची चर्चा
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवान यांच्याशी चर्चा केली. या बैठकीत भारत-अमेरिका सहकार्य, हिंदी-पॅसिफिक महासागर क्षेत्र आणि अफगाणिस्तानसह विविध मुद्यांवर चर्चा झाली. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी अमेरिकेने केलेल्या मदतीसाठी जयशंकर यांनी आभार मानले. लसीच्या मुद्यावर भारत आणि अमेरिका यांची भागीदारी मोठा बदल घडवून आणू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button