संभाजीराजे आणि विनायक मेटेंना एकत्र आणण्याचे प्रयत्न; विखे-पाटलांची माहिती

vikhe patil - sambhajiraje chhatrapati - Maharashtra Today

नाशिक : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून राजकारण चांगलंच तापले आहे. अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहे. तसेच दुसरीकडे भाजप (BJP) नेतेही मराठा संघटनांच्या पाठिशी आहे. अशावेळी भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe-Patil) यांनी सर्व मराठा संघटनांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) आणि विनायक मेटे यांनाही एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी माहिती विखे-पाटील यांनी दिली.

मराठा समाजाच्या भावना जाणून घेण्यासाठी आपण बैठका घेत आहोत. या बैठकीत मराठा आंदोलनाच्या भविष्यातील रणनितीबाबत चर्चा होत असते. आरक्षणाच्या मुद्द्यावर लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. सगळ्या संघटनांच्या नेत्यांनी एकत्र यावे, असे आवाहन विखे-पाटील यांनी केले आहे. खासदार संभाजीराजे आणि विनायक मेटे यांनाही एकत्र आणणार आहे. राज्यात २३ संघटना काम करतात, मग भूमिका वेगळी का? असा सवालही त्यांनी केला आहे.

राज्य सरकार समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. आज किंवा उद्या संभाजीराजेंशी चर्चा होईल. त्यांनी संघटनांच्या बैठकीला यावे. आपली भूमिका ही समन्वयाची आहे. सगळे एकत्र येऊन त्यांना आंदोलन पुढे ढकलण्याची विनंती करूया. कोणत्याही आंदोलनाचे नेतृत्व सामुदायिक असावे. समाजाचा दबाव वाढला की नेते मंडळी पुढे येतील, असा दावाही विखे-पाटलांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button