मंदिर का पाडता विचारणाऱ्या तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न? चित्रा वाघ यांनी सरकारला धरले धारेवर

chitra wagh

मुंबई : अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथे मंदिर पाडण्यासाठी आलेल्या लोकांना – मंदिर का पाडता, असे विचारणाऱ्या युवतीला त्या गुंडांनी घरात घुसून मारहाण केली. तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. याबाबत भाजपाच्या (BJP) उपाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी, राज्यात महिला अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले. राज्य सरकार आणि कायदा-सुव्यवस्थेवर बोट ठेवले.

याबाबत पीडित युवतीने सांगितले की, माझ्या घरासमोरील देवीचे मंदिर पाडण्यासाठी काही लोक आले असता मी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी गावच्या सरपंचासह त्यांनी घरात घुसून मला मारहाण केली. माझा विनयभंग केला. माझ्यावर अतिप्रसंग करण्याचाही प्रयत्न झाला, असा आरोप फिर्यादी तरुणीने केला आहे.

हा अतिक्रमणाचा विषय आहे. ती तरुणी अतिक्रमण हटवण्याला विरोध करत होती, असा आरोप आरोपींची केला आहे. अहमदपूर पोलीस याचा तपास करत आहेत.

याप्रकरणी चित्रा वाघ यांनी ट्विट केले – MPSC ची तयारी करणारी किनगाव अहमदपूरची तरूणी, गावातील भवानी मातेचं मंदिर पाडायला आलेल्या लोकांना मंदिर का पाडताय म्हणून तिनं विचारलं तर तिला घरात घूसून २ तास या लांडग्यांनी मारहाण केली. तिच्या सर्वांगावर चावे घेतले. तिच्या गुप्तांगात दगड टाकले. गळ्यावर कटर चालवायचा प्रयत्न केला. राज्यात झुंडशाही सुरू आहे का?

गुंडांची घरात घुसून मुलींना मारण्याची हिंमत होतेच कशी ?? अधिवेशनात महिला सुरक्षेवर सरकारचे भाषण ऐकून ४ च दिवस उलटले. बलात्काऱ्यांना अभय देण्याच्या सरकारच्या भुमिकेमुळेच हे हरामखोर माजलेत. ज्याची किंमत राज्यातील लेकीबाळींना मोजावी लागते. कुछ तो शर्म करो’, या शब्दात चित्रा वाघ यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER