एकनाथ शिंदे यांच्यावर जादूटोण्याचा प्रयत्न?

Eknath Shinde

ठाणे : नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर जादूटोणा करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एकनाथ शिंदे यांचा फोटो तांदळामध्ये ठेवून मंत्रप्रयोग करणाऱ्या दोन मांत्रिकांना पोलिसांनी पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातून रंगेहात अटक केली असून, मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्यात येत आहे.

कहे तलावली येथील एका घरात पालकमंत्री शिंदे यांच्या फोटोसमोर अगरबत्ती लावून हळद, कुंकू, काळा बुक्का, लिंबू, पांढरा कोंबडा ठेवण्यात आला होता. यावेळी मांत्रिक मंत्रोच्चार करून जादूटोणा करत असतानाच पोलिसांनी दोन आरोपींना रंगेहाथ पकडले. पालघरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी कृष्णा बाळू कुरकुटे व संतोष मगरू वारडी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे यांचा फोटो लावण्यामागील उद्देश काय आहे ? याचा तपास पोलीस यंत्रणा करीत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER