शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची गाडी पेटवण्याचा प्रयत्न, शिवसैनिकांमध्ये रोष

बुलडाणा : या ना त्या विधानांमुळे कायम चर्चेत राहणारे बुलढाण्यातील शिवसेना (Shivsena) आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांच्या घरासमोर उभी असलेली महागडी ४ चाकी महागडी पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे बुलडाण्यात खळबळ उडाली असून, शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला आहे. हा पूर्वनियोजित कट होता, असा आरोप संजय गायकवाड यांनी केला आहे.

संजय गायकवाड यांनी नेहमी प्रमाणे आपली गाडी इनोव्हा कार घरासमोर उभी केली होती. मध्यरात्री अंधाराचा फायदा घेऊन अज्ञात व्यक्तींनी घरासमोर उभी असलेली इनोव्हा कार रात्री 3 ते 4 च्या सुमारास जाळण्याचा प्रयत्न केला. या आगीत गाडीच्या मागील भागाने नुकसान झाले आहे. घटना घडली तेव्हा संजय गायकवाड हे घरात नव्हते. कामानिमिताने संजय गायकवाड मुंबईला गेले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञातांनी गाडी जाळण्याचा प्रयत्न केला. संजय गायकवाड यांची गाडी जाळण्याचा घटनेने खळबळ उडाली आहे

माझी गाडी जाळून मोठा स्फोट घडविण्याचा कट असल्याचा आरोप आमदार गायकवाड यांनी केला आहे. तसंच, राजकीय वादातून हा हल्ला करण्याचा प्रयत्न असावा असा संशय देखील त्यांनी व्यक्त केला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतील. डॉग स्कॉडला देखील पाचारण करण्यात आले. या प्रकरणाचा पोलीस कसून तपास करत आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून संजय गायकवाड हे आपल्या वेगवेगळ्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहे. ‘मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते तर मी ते देंवेंद्र फडणवीसांच्या तोंडातच कोंबून टाकले असते,’ अशा प्रकारचं वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलं होतं. त्यानंतर बुलडाण्यात शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलाच वाद रंगला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button