‘आप’ कडून महावितरण कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न

Attempt by AAP to lock MSEDCL office in kolhapur

कोल्हापूर : वाढीव वीज बिल रद्द करावी या मागणीसाठी आम आदमी पार्टी (AAP) वेळोवेळी निवेदन सादर करून, विजबिलांची होळी करून, एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करून तसेच पालकमंत्र्यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून विजबिलांमधील दरवाढ मागे घेण्याचे आवाहन केले होते.परंतु या सगळ्या आंदोलनांची कोणतीच दखल अद्याप राज्य शासनाने घेतलेली नाही. त्यामुळे चिडलेल्या कार्यकर्त्यांनी आज कोल्हापुरात महावितरणच्या (MSEDCL) कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांसोबत कार्यकर्त्यांची झटापट झाली. कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

यावेळी कार्यकर्त्यांनी ‘लोकडाउन मधील 200 युनिट वीज बिल माफ झालेच पाहिजे’, ‘वीज दरवाढ करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’, ‘ वीज दरवाढीवर निर्णय न घेणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा (Mahavikas Aghadi) धिक्कार असो’ अशा घोषणा दिल्या.

यावेळी ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई, जिल्हाध्यक्ष निलेश रेडेकर, युवाध्यक्ष उत्तम पाटील,संतोष घाटगे, सूरज सुर्वे, धैर्यशील शिंदे, रविराज पाटील, राज कोरगावकर, प्रथमेश सुर्यवंशी, महेश घोलपे, संपदा मुळेकर, लखन काझी, करणसिंह जाधव, यांनी सहभाग नोंदवला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER