सौदी अरेबियात तेल विहरींजवळ हुदी विद्रोह्यांचे हल्ले, इंधन दरवाढीची भारताला बसतीये झळ!

Attacks by Hudi rebels near oil wells

रविवारी हुदी विद्रोह्यांनी सौदी अरेबियातील तेल विहरींजवळ हल्ले केले. याचाच परिणाम म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारात तेल कंपन्यांनी कच्च्या तेलाची किंमत ३ टक्क्यांनी वाढून ७१.३७ डॉलर प्रति बॅरेल केली. याचा थेट प्रभाव भारतावरही पडणार आहे. भारतीय अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाच्या आयातीवर अवलंबून आहे.

गेल्या वर्षी फेब्रुवारीनंतर कोरोना विषाणूचा जगभरात प्रसार सुरु झाला. यानंतर काही आठवड्यातच कच्चा तेलाचे भाव जबदस्त ढासळून किंमती २० डॉलर प्रति बॅरेल इतक्या घसरल्या होत्या. तेव्हापासून आतापर्यंत तेल किंमतीत ८३ टक्क्यांची वाढ झालीये. हीच वाढ भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीसाठी कारणीभूत आहे.

जगात सर्वाधिक कच्चा तेलाचे उत्पादन सौदी अरेबियात होते. अमेरिका आणि चीननंतर सर्वाधिक कच्चे तेल आयात करणारा भारत हा तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. गेल्या वर्षी भारताने त्याच्या एकूण इंधन वापरासाठी ८५ इंधन आयात केले होते. यासाठी १२० अब्ज डॉलर भारताने खर्ची पडले.

अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम

म्हणून सौदी अरेबियाच्या सर्वच निर्णयाचा परिणाम भारतावर होतो. ‘रिझर्व बँक ऑफ इंडीया’च्या एका रिपोर्टनूसार आंतराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत दर १० डॉलर्सची होणारी वाढ भारताला मोठ्या आयात खर्चात टाकते. दुसऱ्या बाजूला पेट्रोल आणि डिझेलचे दर भारतात वाढतायेत. गेल्या दिवसांमध्ये भारतात काही शहरात पेट्रोलचा दर १०० रुपये प्रति लीटरपर्यंत पोहचलाय.

गेल्या सहा वर्षांपासून आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धांमुळं तेलाच्या आयातीवर नेहमी प्रश्नचिन्ह असतं. त्यामुळं भारताची अशी इ्च्छाय की, ‘सौदी अरब आणि यमनच्या विद्रोह्यांमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी. यांच्यातील युद्धांमुळं कच्चा तेलाचे वारंवार वाढणारे दर भारतीय अर्थव्यवस्थेसाठी योग्य नाहीयेत.’ असं भारताच म्हणनं आहे.

रविवारी इराण समर्थीत विद्रोही गटाचे प्रवक्ते याहीरा सारी ने सांगितलं की सौदी अरबवर त्यांनी आठ बॅलेस्टीक मिसाइल्सनी आणि १४ बॉम्ब लादलेल्या ड्रोन्सनी सौदी अरेबियातील तेल उत्पादक क्षेत्रावर हल्ले करण्यात आलेत. सैदी अरेबियाच्या उर्जा मंत्रालयानं हे हल्ले झालं असल्याचं सांगत ‘रास तुनरा निर्यात टर्मिनल’वर ड्रोनने हल्ले झालेत पण कोणतीच जीवीत अथवा वित्तहानी झाली नसल्याचं कबूल केलंय.

विद्रोह्यांचे हल्ले

सहा वर्षापूर्वी यादवी युद्धानंतर शिया हुदी आतकंवादी संघटनेनं सैदीतील उत्तरी भागावर कब्जा मिळवला. या आतंकवादी संघटनाला इराणचं समर्थन मिळत असल्याचा आरोप सौदी अरेबिया करते आहे. यानंतर संयुक्त अरब अमिरात (युएई)ने २०१५ ला अन्य देशांच्या सैन्याशी हात मिळवून विद्रोह्यांविरुद्ध मोहीम उघडली होती. यात १२ हजाराहून अधिक लोकांना प्राण गमवावे लागले होते.

अमेरिकेची भूमिका बायडन यांच्या अडचणीत वाढ

ट्रम्प यांनी सौदी अरेबियातील या विद्रोही संघटनाला आतंकवादी घोषित केलं. पण जो बायडन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले आणि त्यांनी हा निर्णय मागे घेतला यानंतर विद्रोही गटानं पुन्हा सौदी अरेबियावर मिसाइल आणि ड्रोन हल्ले सुरु केलेत.

बायडन यांच्या निर्णयामुळं ही परिस्थीती निर्माण झाल्याच चित्र असून बायडन प्रशासनाच्या अडचणीत मोठी वाढ झालीये. रविवारी झालेला हल्ला हा आठवड्यातला दुसरा हल्ला होता.

भारताच्या मागणीवर दुर्लक्ष

सौदी अरेबियातील युद्धजन्य परिस्थीतीमुळं वारंवार तेल किंमतीत होणारी वाढ रोखण्यासाठी इतर देशांनी उत्पन्न वाढवावं अशी मागणी भारताने केली होती. पण भारताच्या या मागणीकडं सर्वांनीच डोळेझाक केलीये. कोणत्याच तेल उत्पादक राष्ट्राकडून या मागणीला प्रतिसाद मिळाला नाही.

गेल्या सहावर्षापासून सौदीत असलेल्या युद्धाच्या परिस्थीतीमुळं वारंवार तेलाच्या उत्पन्नात अनियमितता येतीये त्यामुळं भारतासारख्या तेल आयात करणाऱ्या राष्ट्रांना वारंवार इंधन दरवाढीचा सामना करावा लागतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER