तलवारीने व्यापाऱ्यावर हल्ला

Attack the merchant with the sword

औरंगाबाद : एकाच भागात राहणा-या चौघांनी जुन्या भांडणातून व्यापाऱ्यावर तलवारीने हल्ला चढविला. यात व्यापाऱ्याच्या छातीवर व डोक्यावर जबर जखम झाली आहे. ही घटना २९ मे रोजी रात्री १२ ते १२.३० च्या सुमारास लोटाकारंजा, मोमीनपुरा भागात घडली. मोहम्मद काशोफोद्दीन सिद्दीकी मोहम्मद नसीमोद्दीन सिद्दीकी (२६) यांचा इसाक व अल्ताफ बेग यांच्याशी जुना वाद आहे. या वादातून इसाक, बेग, त्यांचा साथीदार व इसाकची सासू मुन्नी यांनी सिद्दीकीच्या घरात शिरून त्याच्यावर तलवारीने हल्ला चढविला. यावेळी घरगुती साहित्याची नासधूसदेखील झाली. या प्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER