
जलालाबाद :- शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल (Shiromani Akali Dal chief Sukhbir Singh Badal ) यांच्यावर जलालाबाद येथे प्राणघातक हल्ला करण्यात झाला. बादल यांच्या गाडीवर गोळीबार करण्यात आला. यानंतर पंजाबमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या हल्ल्याची काही दृश्ये व्हिडीओत आली आहेत. तो व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पंजाबमध्ये नगरपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या संदर्भात सुखबीरसिंग बादल (Sukhbir Singh Badal) उमेदवारांसोबत जलालाबाद येथे आले होते. अर्ज दाखल करताना शिरोमणी अकाली दल आणि काँग्रेसचे कार्यकर्ते समोरासमोर आलेत. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुखबीरसिंग बादल यांच्या गाडीवर हल्ला केला. यानंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली, गोळीबारही करण्यात आला. वातावरण तणावाचे झाले आहे.
निवडणूक अर्ज दाखल करताना झालेल्या या झटापटीमुळे प्रकरण चिघळले. शिरोमणी अकाली दलाच्या एका गाडीचे तर काँग्रेसच्या दोन गाड्यांचे नुकसान झाले आहे. बरेच कार्यकर्ते जखमी झाले आहेत. सुखबीर सिंग बादल सुरक्षित आहेत.
आरोप-प्रत्यारोप
या हल्ल्याबाबत काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दलाने एकमेकांवर आरोप केला आहे. अकाली दलाचे नेते सत्येंद्रजित सिंग मंटा यांनी काँग्रेसवर गोळीबाराचा आरोप केला व तीन कार्यकर्ते जखमी झाल्याची माहिती दिली. काँग्रेस आमदार रवींद्रसिंग आवला यांच्या दोन गाड्यांचे अकाली दलाच्या कार्यकर्त्यांनी नुकसान केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
धरणे
या हल्ल्याच्या निषेधार्थ शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांनी धरणे आंदोलन केले. ते म्हणालेत – त्यांना वाटले गोळीबार करून शिरोमणी अकाली दलाच्या कार्यकर्त्यांना आपण घाबरवू, मात्र आता कोण पळून जाते आहे? त्यांना पळून जावे लागते आहे.
Police will take action against whoever is found guilty: Fazilka SSP Harjeet Singh on attack on Shiromani Akali Dal president Sukhbir Singh Badal’s vehicle in Jalalabad https://t.co/ZdLgoehbld pic.twitter.com/A64EVbNuh8
— ANI (@ANI) February 2, 2021
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला