‘जय हिंद’च्या शालिवाहन माने-देशमुख यांच्यावर हल्ला

साखर कारखान्याच्या लिलावाचा वाद

Mane-Deshmukh

उस्मानाबाद : आजारी साखर कारखाना विकत घेण्यासाठी लिलावात भाग घेतल्यामुळे जय हिंद साखर कारखान्याचे संचालक शालिवाहन माने-देशमुख यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. बब्रुवान माने-देशमुख यांनी यासदंर्भात बेंबळी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

तक्रारीत म्हटले आहे की, मी व माझे भाऊ शालिवाहन माने-देशमुख पंजाब नॅशनल बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया यांच्या आग्रहास्तव उस्मानाबादच्या नितळी येथील ‘जय लक्ष्मी शुगर’ हा कारखाना पाहण्यासाठी गेलो होतो. हा कारखाना दोन्ही बँकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने लिलावात काढला आहे. कारखान्यात विजय दंडनाईक यांचा मुलगा रोहित दंडनाईक याने आमच्या गाडीला गाडी आडवी लावली.

त्याने व त्याच्या साथीदारांनी आमच्या गाडीच्या काच फोडल्या, आमच्यावर प्राणघातक हल्ला केला. कोरोनाच्या कंटेन्मेंट झोनमध्ये बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी आमचा जीव वाचवला. बेंबळी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी आरोपींना अभय दिले, घटनेचे गांभीर्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. असा आरोप माने-देशमुख यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER