आज बाळासाहेब असते तर ही घटना घडलीच नसती ; नौदल अधिकाऱ्याच्या मारहाणीवर अभिनेत्रीचा संताप

Balasaheb Thackeray - Ratan Rajput

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबद्दल आक्षेपार्ह व्यंगचित्र काढणारे माजी नौदल अधिकारी मदन शर्मा (Madan Sharma) यांना शिवसैनिकांनी (Shiv Sena) मारहाण केली. या घटनेमुळे वातावरण चांगलेच तापले आहे .

या घटनेवर अभिनेत्री रतन राजपूत (Ratan Rajput) हिने संताप व्यक्त केला आहे. जर आज आपल्यासोबत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) असते तर अशी घटना घडलीच नसती. आम्ही खऱ्या वाघाला मिस करतोय.” अशा आशयाची पोस्ट लिहून तिने या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.

रतनची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER