नड्डा यांच्या ताफ्यावर हल्ला : उत्तर द्यावेच लागेल; अमित शहा यांचा ममता सरकारला इशारा

Amit Shah-Mamata Banerjee

दिल्ली :- पश्चिम बंगालमध्ये भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा आणि कैलाश विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर आज (गुरुवारी) हल्ला करण्यात आला. हे दोन्ही नेते कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी चालले असताना त्यांच्या गाड्यांवर हल्ला करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी गंभीर दखल घेतली व याबाबतचा अहवाल मागवला आहे. ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना याचे उत्तर द्यावे लगेल, असा इशारा दिला.

जे. पी. नड्डा (J P Nadda) यांच्या ताफ्यावर आणि कारवर विटा आणि दगडांनी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात भाजपाचे काही नेते जखमी झाल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा  यांनी यासंबंधी अहवाल मागवला आहे.

ही बातमी पण वाचा : पश्चिम बंगालमध्ये जे पी नड्डा यांच्या ताफ्यावर हल्ला, तृणमूलच्या कार्यकर्त्यांवर आरोप

अमित शाह यांनी ट्विट केले – “आज बंगालमध्ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यावर हल्ला झाला ही खूपच निंदनीय घटना आहे. या घटनेचा कितीही निषेध करावा तरी कमीच आहे. केंद्र सरकारने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. या राजकीय पुरस्कृत हिंसेच्या घटनेबाबत बंगालच्या सरकारला आता शांतताप्रिय जनतेला उत्तर द्यावंच लागेल”.

नड्डा यांच्या ताफ्यातील कारचा एक व्हीडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून यामध्ये कारवर विटा आणि दगडांनी हल्ला करत काचा फोडल्याचे दिसते आहे. हल्ल्यात पक्षाचे नेते मुकूल रॉय आणि कैलाश विजयवर्गीय जखमी झाल्याची माहिती नड्डा यांनी दिली. ते म्हणालेत – “आज झालेल्या हल्ल्यात मुकूल रॉय आणि कैलाश विजयवर्गीय जखमी झाले आहेत. लोकशाहीसाठी ही लज्जास्पद घटना आहे. हल्ला झाला नाही अशी एकही कार ताफ्यात राहिली नाही. मी बुलेटप्रूफ कारमध्ये होतो म्हणून सुरक्षित आहे. पश्चिम बंगालमधील अराजकता आणि असहिष्णुता संपवावी लागेल. मी आज केवळ दुर्गादेवीच्या आशीर्वादानेमुळेच बैठकीत पोहोचू शकलो. ”


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER